'कष्टाचा पाऊस'
Marathi Kavita मराठी कविता
ऐन दुपारी, तापल्या उन्हात अचानक जेव्हा मेघ दाटून येवून पावसाला सुरुवात होते त्यावेळी बळीराजाच्या चेहर्यावरील आनंद बघून सुचलेली ही कविता 'कष्टाचा पाऊस'. दिवसभर काबाडकष्ट करून थकल्या-भागल्या चेहर्यावर दाटून आलेले घामाचे थेंब जेव्हा आलेल्या पावसात मिसळून जातात त्यावेळी खर्या अर्थाने आपल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना उरी बाळगून हा बळीराजा मनोमन सुखावून जातो.
![]() |
| 'कष्टाचा पाऊस' - मराठी कविता |
कष्टाचा पाऊस
थेंब कष्टाच्या घामाचं
तापल्या मातीनं टिपलं
आठवणींत आज माझ्या
उजुन शिवार सजलं
थंडगार रानवारा
आज भरला अंगात
बहरलं तन-मन
या तापल्या उन्हात
मऊ मातीचा तो स्पर्श
गेला सुखावून पाऊल
या आतुर ओढीची
देत असे चाहूल
आलं आभाळ दाटून
बरसलं अवचित
घामाचं ते थेंबं
मिसळलं पावसात..!
🖋
- विश्वजीत राळे पा.


0 Comments
Offensive, spam comments are strictly prohibited.