शेर ' शिवराम' है - हुतात्मा शिवराम हरी राजगुरू
जयंतीदिन विशेष लेख
'२४ ऑगस्ट'
![]() |
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू |
शेर 'शिवराम' है
२३ मार्च १९३१, त्या दिवशी 'शहीद-ए-आजम' भगतसिंग यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून ऐन तारुण्यातील २३ वर्षांचा आणखी एक युवान याच भारतमातेसाठी हुतात्मा झाला. परंतु खंत याचीच वाटते, की भारतमातेचा स्वाभिमान असणारा हा 'महाराष्ट्राचा सुपुत्र' आम्ही घरोघरी पोचवण्यासाठी खूप वेळ लावला. याचाच परिणाम म्हणून की काय, तो मग एक 'Side Actor' च्या भूमिकेत केवळ एक करमणुकीचं पात्र म्हणून इथल्या काही चित्रपटांमधून आमच्या समोर येवू लागला आणि आम्ही सताड उघड्या डोळ्यांनी दिग्दर्शकाने आपल्या मर्जीप्रमाणे रंगवलेल्या त्या पात्रातील राजगुरूंचा मनमुराद-मिस्कीलपणाने आनंद घेवू लागलो. आपल्याला जेव्हा आपल्याच इतिहासाचा विसर पडू लागतो ना त्याचेच बहुधा हे परिणाम..!
भारतमातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी, ब्रिटीश राजवट समूळ उखडून टाकण्यासाठी ज्या नरवीराने आपल्या रक्ताचा अभिषेक केला असा या मराठी मातीत उपजलेला एक धगधगता अंकुर अन देशप्रेमासाठी हसत हसत हौतात्म्य पत्करलेला एक महान क्रांतिवीर. वयाच्या केवळ १४ व्या वर्षी अपमान सहन न झाल्याने अंगातील कपड्यानिशी घराचा त्याग करणारा एक बालक ते भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक तेजस्वी तारा. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीतील ‘रघुनाथ’. देशप्रेमाखातर शहीद होण्यासाठी आसुसलेला व नेहमीच तयार असणारा एक प्रखर देशभक्त. ‘पंजाब केसरी’ लाला लजपत राय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी साँडर्स अधिकार्यावर पहिली गोळी चालवणारा एक निष्णात नेमबाज. संस्कृत भाषेचे अभ्यासक, वेदांचे उत्तम जाणकार, लाठी-काठी, दांडपट्टा, कुस्ती पारंगत व्यायामविशारद. आमच्या राजगुरूनगर (खेड) नगरीचे सुपुत्र, महाराष्ट्राचा अभिमान अन भारतभूची शान हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांस जयंती निमित्त (२४ ऑगस्ट १९०८) विनम्र अभिवादन..!
आपला ज्वलंत इतिहास फक्त इतिहासातील पुस्तकाच्या त्या २ ओळींपुरता मर्यादित न राहता जेव्हा संपूर्ण समाजाच्या कानाकोपर्यात पोहोचेल तेच खरे आपणांस अभिवादन ..!
🖋
- विश्वजीत राळे पा.
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू
विश्वा म्हणे..!
विश्वजीत राळे पा.
#rajguru #राजगुरू #क्रांतिकारक #krantikarak #हुतात्मा_शिवराम_हरी_राजगुरू #भगत_सिंग #BhagatSingh
2 Comments
वाखाणण्याजोगं लिखाण. खरंच, कृतघ्न होत चाललेल्या आधुनिक पिढीचे आणि राजगुरुंच्या वक्तित्वाचे कमीत कमी शब्दात केलेले वर्णन, उल्लेखनीय आहे.
ReplyDeleteshort and sweet ...informative 🤟
ReplyDeleteOffensive, spam comments are strictly prohibited.