' मेघा बरस बरस ' - Marathi Kavita मराठी कविता

' मेघा बरस बरस ' 

 Marathi Kavita मराठी कविता

एखादा भक्त ज्या आतुरतेने  ईश्वर भेटीची वाट बघत असतो त्याहूनही अधिक आतुरतेने, प्राण डोळ्यांत आणून पावसाची वाट अवघ्या जगाचा पोशिंदा असलेला हा बळीराजा बघत असतो. कित्येक विनवण्या, कित्येक आर्जवे करून देखील त्याच्या संयमाची परीक्षा बघणारा, दडी मारुन बसलेला हा पाऊस ज्यावेळी त्याच्या नेत्रांतून ओघळतो, त्यावेळी त्याने केलेली ही प्रार्थना, एक मागणं या आशयाची ही कविता..  ' मेघा बरस बरस '


'Marathi Kavita मराठी कविता'

'मेघा बरस बरस'

विश्वा म्हणे..!

विश्वजीत राळे पा.



मेघा-बरस-बरस-Marathi-Kavita-मराठी-कविता
' मेघा बरस बरस '- मराठी कविता


 मेघा बरस बरस 


मेघा बरस बरस 

का रे चाललासी दूर

किती बघू तुझी वाट 

मनी लागे हुरहूर


मेघा बरस बरस

नको देऊ आता हूल

झाले आतूर हे नेत्र

बघाया तुझी चाहूल


मेघा बरस बरस 

फुलू दे उभं शिवार

कर आम्हावरी कृपा

होवू दे समदं हिरवगार


मेघा बरस बरस

टाक पुसून ते आसू 

बळीराजाच्या चेहर्‍यावर

पुन्हा उमटू दे हासू


🖋

- विश्वजीत राळे पा.


"मेघा बरस बरस"

'Marathi Kavita मराठी कविता'

विश्वा म्हणे..!

विश्वजीत राळे पा.

Post a Comment

0 Comments