' ..त्यासाठी हवा संयम '
विश्वा म्हणे..!
..त्यासाठी हवा संयम
नजरेसमोर दाटलेलं धुकं अन त्या धुक्यांत हरवलेली नजर..! उद्याचा शोध घेताना थकलेल्या या नजरेसमोर दाटलेलं आज जे धुकं आहे त्या धुक्याच्या पलीकडचे पाहण्यासाठी हवा संयम. कारण वेगाने वाहणारा वारा देखील जेव्हा अनपेक्षितपणे आपली दिशा बदलतो, नजरेसमोरील धुक्यांना दूर सारून क्षणार्धात सारा कायापालट करतो, तेव्हा याच नजरेसमोर असते ते एक नयनरम्य दृश्य..ज्याचे स्वप्न पाहून ते सत्यात साकार करण्यासाठी आपण कित्येक मिनिटं, कित्येक तास, कित्येक दिवस, कित्येक वर्ष साधना केलेली असते. यासाठीच हवा तो संयम अन त्या वार्यावर विश्वास..!
🖋
- विश्वजीत राळे पा.

0 Comments
Offensive, spam comments are strictly prohibited.