लता मंगेशकर - शब्द सुमनांजली, Lata Mangeshkar

 

'लता मंगेशकर'

 शब्द सुमनांजली

लता मंगेशकर ..एक आवाज..ज्याने इथल्या जवळपास ३-४ पिढ्यांना आपल्या दैवी स्वरांनी तृप्त केले, ज्याने कित्येक मनांवर स्वराभिषेक घालून पवित्र केले. एक असा आवाज, जो वेगवेगळ्या शृंगारांनी आमच्या हृदयात कोरला गेला. कधी प्रार्थना, कधी राग, कधी प्रेम, कधी अश्रू, कधी हास्य, कधी देशप्रेम, कधी पूजा, तर कधी ईश्वरभक्ती. कधी रुसवा, कधी निखळ-अवखळ, कधी शांत तर कधी तितकाच धारदार, यांसारख्या कित्येक रूपांनी जो आवाज सजला असा दैवी आवाज लाभलेल्या, ज्यांच्या कंठात साक्षात सरस्वतीने वास केला त्या भारतरत्न लता मंगेशकर या आज आपल्यातून जरी निघून गेल्या असल्या तरी इथल्या मनामनांत त्या सदैव वास करतील..त्यांनी गायलेल्या त्या गीताप्रमाणे.. 


"तुम मुझे यूं भुला ना पाओगे, जब कभी भी सूनोगे गीत मेरे, संग संग तुम भी गुन गुनाओगे"  

 

'Lata Mangeshkar' 

'लता मंगेशकर'


लता मंगेशकर



 लता मंगेशकर


विश्वा म्हणे झाले

पोरके अवघे सूर 

आज तो दैवीस्वर

कुठे हरवला 


🖋

- विश्वजीत राळे पा.


विश्वा म्हणे..!

'Lata Mangeshkar' 

'लता मंगेशकर'

विश्वजीत राळे पा.

Post a Comment

2 Comments

  1. भावपूर्ण श्रद्धांजली💐
    अप्रतिम लेख👌

    ReplyDelete

Offensive, spam comments are strictly prohibited.