' विठ्ठलवारी '
ज्येष्ठ कृ. सप्तमी-अष्टमी.. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा आपल्या असंख्य भाविकांसोबत पंढरीला प्रस्थान करण्याचा दिवस.
आजकाल आपण जे जे जल्लोषाचे सोहळे साजरे करतो त्याकडे पाहताना वाटते की खरंच दिंडी, विठ्ठलवारी हा एखादा थोतांड जल्लोषाचा सोहळा नाहीच मुळी. तर मुक्तीची अनुभूती देणारा अखंड भक्तीसागराचा एक प्रवाह, ज्यात नाहताना प्रत्यक्ष ईश्वरभेटीचा भास होतो. वर्षानुवर्षे चाललेल्या या सोहळ्याला जो इतिहास आहे, जी परंपरा आहे त्यात तसूभरही कमी पडू न देता अखंड पावित्र्य जपत आजही तितक्याच चैतन्यात, त्याच जल्लोषात हा सोहळा पार पडतो हे विशेष.
भक्तीरस, प्रेमरस, विरहरस यांसारख्या कित्येक शृंगारांनी नटलेला; मध्ययुगीन भारतीय कालखंडापासून ते आजतागायत अखंड-अविरतपणे समाज घडवण्याचे, त्या समाजावर संस्कार करण्याचे कार्य करणारा; जात-पात, धर्म-वर्ण, रंक-राव कसलाही भेद न करता सर्वांना भागवत धर्माच्या पताकेखाली एकत्र आणून माणसाला माणुसकीची शिकवण देणारा, मानवतेचे दर्शन घडवणारा, भक्तीरसात चिंब-चिंब न्हाऊ घालणारा हा सोहळा म्हणजे विठ्ठलवारी..!
त्या अनुषंगाने रचलेली माझी ही प्रस्तुत काव्यरचना.
विठ्ठलवारी
दिंडी


0 Comments
Offensive, spam comments are strictly prohibited.