बाबा तू हवाहवासा..!
विश्वा म्हणे..!
त्या गतकाळातील स्मृती
मज एकांती गाठती
मनी साठवलेले अश्रू
नेत्रांतून अलगद ओघळती
मूर्ती तुझी अंतरीची
दावी वाट जीवनाची
सावली बनुनी द्यावी
मज प्रेरणा जीवनाची
अर्ध्यावर सोडूनी वसा
का दूर गेलास असा ?
विरह तुझा नकोसा ,
थांबला असतास जरासा..
बाबा तू हवाहवासा,
बाबा तू हवाहवासा..!
🖋
- विश्वजीत राळे पा.
विश्वा म्हणे..!


0 Comments
Offensive, spam comments are strictly prohibited.