मैं जिंदगी का साथ निभाता चला गया...
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुएँ में उड़ाता चला गया
बर्बादियों का सोग मनाना फ़ुज़ूल था
बर्बादियों का जश्न मनाता चला गया
जो मिल गया उसी को मुक़द्दर समझ लिया
जो खो गया मैं उस को भुलाता चला गया
ग़म और ख़ुशी में फ़र्क़ न महसूस हो
जहाँ
मैं दिल को उस मक़ाम पे लाता चला गया
काही काही गाणी हे केवळ गाणी नसतात
तर ती बऱ्याच जणांसाठी जीवनगीत बनून
जातात. त्याच प्रकारातले हे एक गाणं, "मै जिंदगी का
साथ निभाता चला गया".
साठच्या दशकात प्रदर्शित झालेला 'हम
दोनो' या चित्रपटात 'देव आनंद' यांनी आपल्या उत्कृष्ट अदाकारीने लोकांच्या काळजात
भिनवलेलं हे गाणं. जवळपास साठहून अधिक वर्षे झाली असली, तरी या गाण्याचे गारुड आजही
श्रोत्यांच्या मनावर कायम आहे. विशेष म्हणजे पाश्चात्त्य संगीताच्या आहारी
जात असल्याचा दोष ज्या तरूण पिढीच्या माथी मारला जातो त्यांच्या मुखी हे गाणं
गुणगुणताना विशेष समाधान वाटते.
'गझल' प्रकारात या गाण्याची रचना केलेली आहे. साहिर लुधियानवी यांनी आपल्या शब्दांनी या गाण्यात प्राण फुंकले आहेत. 'जयदेव' यांनी आपल्या अफलातून संगीताने या गाण्याला 'चार चांद' लावले आहेत आणि 'मोहम्मद रफी' यांनी आपल्या सुमधुर आवाजाने या गाण्यातील भाव जीवंत करून हे गाणं अजरामर केलं आहे.
आयुष्यात चांगले वाईट क्षण हे येतच
असतात पण हताश न होता, निराश न होता प्रयत्न करत राहिले पाहिजेत असा
संदेश हे गाणं देतं. उध्वस्त झालेल्या आयुष्याचा शोक करत बसण्यापेक्षा, ते विसरून,
त्यातून
प्रेरणा घेऊन काय चुकलंय याचा शोध घेऊन नवीन आव्हानांना सामोरं कसं जायचं, हे या गाण्यातून सांगितलं गेलंय.
🖋
- विश्वजीत राळे
0 Comments
Offensive, spam comments are strictly prohibited.