...तर रचला जाणार इतिहास !
ज्या मोहिमेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे ते 'चांद्रयान-३' अंतराळयान (स्पेस्क्राफ्ट) उद्या (१४ जुलै) अवकाशात झेपावेल. हे यान २३ ऑगस्ट या दिवशी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
त्यामुळे अमेरिका, सोव्हियत संघ, चीन यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळयान उतरवणारा भारत हा ४ था देश ठरणार आहे. परंतु या मोहिमेचे वैशिष्ट म्हणजे, जर ही मोहीम यशस्वी झाली तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा जगातील पहिला देश म्हणून भारताची गणना होईल. आजवर असा प्रयोग अन्य कोणत्याही देशाने केलेला नाही. चंद्रावर ज्या ज्या मोहिमा आखल्या गेल्या, त्या चंद्राच्या इक्वेटरजवळ (विषुववृत्त) आखल्या गेल्या. सामान्यपणे इक्वेटरजवळील वातावरण, तेथील पृष्ठभाग हा ध्रुवीय वातावरणापेक्षा बराचसा अनुकूल असतो.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मोठ्या प्रमाणात क्रेटर्स (मेटेरॉइडच्या धडकेमुळे पडलेले मोठमोठे खड्डे) आहेत. तेथील तापमानदेखील जवळपास उणे २३० अंश सेल्सिअस (-230°C) इतके असते. तिथला काही भाग असा आहे, की जेथे अद्यापही सूर्यप्रकाश पोहोचलेला नाही. त्यामुळे येथे मोहीम राबवणे हे जरी आव्हानात्मक असले, तरी या आव्हानाचा स्वीकार करून नवीन इतिहास रचण्यासाठी भारत सज्ज झाला आहे.
__________________
विश्वजीत राळे
#विश्वा_म्हणे
#VishvaaMhane
#Chandrayaan3 #india #ISRO #चंद्रयान #spacemission #science #MoonMission #विश्वा_म्हणे #VishvaaMhane
0 Comments
Offensive, spam comments are strictly prohibited.