"जब खुद का घर जल रहा हो,
तो दूसरों के घर आग बुझाने नहीं जाते"
मणिपूर वाचवा
मे महिन्यात घडलेली घटना. ज्या घटनेचा तेव्हा FIR देखील नोंद झालेला; परंतु आज एक व्हिडिओ viral होतो, मग पोलीस प्रशासनाला जाग येते व एका आरोपीला अटक होते.
मागील जवळपास ३ महिने मणिपूर अक्षरशः जळत आहे. एन. बिरेन सिंग कोणत्या आत्मविश्वासाने अजूनही खुर्चीला चिकटून आहे, याचे नवल वाटते. याच कालावधीत पंतप्रधान विदेश दौऱ्यांमध्ये इतके मश्गूल होते, की त्यांना मणिपूरला एखादी भेट देण्याची देखील गरज वाटली नाही.
'कलम ३७० रद्द', 'राममंदिर निर्माण' यांसाठी इतिहासाला जर आपली नोंद घ्यावी लागली, तर त्यावर 'मणिपूरच्या अध्याया'चा काळा बटबटीत डाग कायम राहील, यात शंका नाही.
"जब खुद का घर जल रहा हो,
तो दूसरों के घर आग बुझाने नहीं जाते"
_______________________________
विश्वजीत राळे
#SaveManipur #manipurisburning #manipurviolencenews #मणिपूर_वाचवा #मणिपूर #मणिपूर_हिंसाचार #VishvaaMhane #विश्वा_म्हणे
0 Comments
Offensive, spam comments are strictly prohibited.