जागतिक जैवइंधन दिन
'इथेनॉल मॅन' (#EthanolMan) म्हणून जगभरात ख्याती पावलेले डॉ. प्रमोद चौधरी यांना २०२०मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या नावाने दिला जाणारा प्रतिष्ठेचा सन्मान प्राप्त झाला आणि प्रमोद चौधरी हे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. हा बहुमान मिळविणारे ते पहिले भारतीय आणि दुसरे आशियाई व्यक्ती तर आहेतच, परंतु एक पुणेकर म्हणून नक्कीच त्यांचा अभिमान आहे.
इथेनॉलचे उत्पादन करणारी एक अग्रगण्य कंपनी असलेल्या 'प्राज इंडस्ट्रीज'ची त्यांनी स्थापना करून जवळपास ७५हून अधिक देशांत तिचा त्यांनी विस्तार केला.
• तत्पूर्वी इथेनॉल म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहे, याविषयी जाणून घेऊयात.
सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे इंधन म्हणून इथेनॉलकडे बघितले जाते. Agricultural Waste म्हणजेच कृषीजन्य टाकाऊ पदार्थांपासून इथेनॉलची निर्मिती केली जाते. ज्यात प्रामुख्याने ऊस, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन यांसारख्या विविध पिकांपासून तयार होणाऱ्या कडबासदृश टाकाऊ पदार्थांचा समावेश होतो.
आजच्या घडीला पाहिले, तर पेट्रोलमध्ये २ टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळले जाते. हेच प्रमाण २०३०मध्ये २० टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. इथेनॉलमुळे हवेत उत्सर्जित होणाऱ्या कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण कमी होऊन हवा प्रदूषण कमी होण्यास मदत होते.
आगामी काळात फ्लेक्स फ्युएल इंजिन विकसित केली जाणार आहेत, ज्यात मुख्य इंधन म्हणून जवळपास ८३ टक्के इथेनॉलचा वापर करण्यात येणार आहे.
तर असे हे इथेनॉल. एक जैवइंधन म्हणून त्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
आज १० ऑगस्ट, 'जागतिक जैवइंधन दिन' ( World Biofuel Day). त्यानिमित्त हा लेखनप्रपंच..!
#pramodchaudhari #ethanolman #biofuelday #WorldBiofuelDay #prajindustries #जागतिक_जैवइंधन_दिन
0 Comments
Offensive, spam comments are strictly prohibited.