‘फ्लोरा फाऊंटन’ ते ‘हुतात्मा चौक’
मुंबईच्या फोर्ट परिसरात गेलं, तर नजरेस पडतात इथले पोर्तुगीज आणि ब्रिटीशकालीन स्थापत्यशैलीचे नमुने! मग कधी प्रश्न नाही पडला, की हातात मशाल असलेल्या एका सामान्य कामगाराचा आणि शेतकऱ्याचा ‘हा’ पुतळा येथे का आणि कसा?
'हुतात्मा स्मारक'… संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शहीद झालेल्या हुतात्मांच्या स्मृतीप्रित्यर्थ, २१ नोव्हेंबर १९६१ साली या स्मारकाची उभारणी करण्यात आली. आणि मग ‘फ्लोरा फाऊंटन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चौकाचं नामकरण ‘हुतात्मा चौक’ असं करण्यात आलं.
![]() |
| संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन, दादर |
मुंबईला तर कित्येकदा जातोच आपण, त्यावेळी फक्त ‘गेटवे ऑफ इंडिया’ आणि ‘ताज’च्या बाहेर फोटो काढून येऊ नका; तर फोर्ट परिसरातील हे ‘हुतात्मा स्मारक’ आणि महाराष्ट्राचा इतिहास सांगणारं दादरमधील ‘संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन’ याठिकाणीदेखील जरा वेळ काढून भेट द्या… प्रेरणा तर मिळेलच, त्यासोबतच ‘महाराष्ट्रीय’ असल्याचा अभिमानदेखील नक्कीच द्विगुणीत होईल!



0 Comments
Offensive, spam comments are strictly prohibited.